WHY US
Share Market, Mutual fund यात investment करणं म्हणजे लाखाचे बारा हजार... अस मनाला पक्कं समजावून मेंदूचा एक कप्पा आम्ही एवढे दिवस बंद करून ठेवला होता.
पण प्रदीप आणि विजया यांनी SIP ची चावी लावून हे टाळ उघडलं.
सशक्त गुंतवणुकीचा सुकर मार्ग केवळ प्रदीप आणि विजया मुळे समजला,
नाहीतर पोस्टात किंवा बँकेत एखाद recurring account उघडलं म्हणजे झालं, पण "Saving is not an investment" हे मूलभूत सूत्र याच जोडीने डोक्यात घातलं.
गुंतवणूक करणारा एक हजार वाला असो नाहीतर एक लाख वाला सगळ्यांसाठी सारखाच वेळ देत, ही कल्पना त्याच्या डोक्यात रजवण्याच खूप महत्त्वाचं काम ही जोडी निष्ठेने करतेय.
आणि तुमच्या गुंतवणुकीचा अहवाल दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तुमच्या ईमेल वर न चुकता येणार, यात शंका नाही.
आम्ही ही गेली पाच - सहा वर्ष SIP मध्ये गुंतवणूक करतोय, आणि त्याचा खूप चांगला रिझल्ट देखील आहे.
आत्ता तर आम्हीही लोकांना गुंतवणुकीच्या या मार्गावर चालण्यासाठी सुचवतो, आणि अर्थात गाईड म्हणून विजया प्रदीप यांचा हात धरून.
कारण सुंदर मार्गदर्शन आणि तत्पर सेवा.
श्री. अनिल जगन्नाथ चाळके
सौ. उल्का अनिल चाळके.